“गुळवेल” रानभाजीचे औषधी महत्त्व व पाककृती.

👇Click and Listen

“गुळवेल” रानभाजीचे औषधी महत्त्व व पाककृती.

औषधी गुणधर्म : गुळवेलीची मुळे, खोड, पाने ही आयुर्वेदीय औषधोपचारामध्ये वापरली जातात. कुष्ठरोग, मधुमेह, हायकोलेस्टेरॉल, ज्वर, पोटाचे विकार, गाऊट (शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण सामान्यापेक्षा अधिक वाढणे), संधीवात, अस्थिरोग, काविळ, जठरातील व आतड्यातील व्रण, परमा (गरमी) व रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याकरीता उपयुक्त. हिचे उपयुक्त रासायनिक घटक, कर्करोग निर्मूलन, ऑक्सिडीकरण रोधक, रोगप्रतिकारक शक्तीवर्धक, कर्करोगाच्या गाठीरोधक, दाहनाशक, सूक्ष्मजीवरोधक, अस्थिसुषिरतारोधक आहे.

पाककृती :

१) गुळवेलीच्या कोवळ्या पानांची भाजी :

साहित्य : कोवळी पाने, कांदा, लसूण, तेल, तिखट, मीठ, इ.

कृती: पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरुन घ्यावीत. लसूण पाकळ्या ठेचून व कांदा बारीक चिरुन घ्यावा. पातेल्यामध्ये फोडणीसाठी तेल गरम करुन त्यामध्ये ठेचलेल्या लसूण पाकळ्या व चिरलेला कांदा फोडणी द्यावी. लसूण व कांदा किंचित पिवळसर झाला की बारीक चिरलेली भाजी फोडणीस द्यावी. त्यामध्ये तिखट मसला व चवीपुरते मीठ घालून भाजी मंद आचेवर वाफवून शिजवावी व खाण्यास घ्यावी.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment