लोकशिक्षण विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी.

👇Click and Listen

लोकशिक्षण विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी.

बुधवार दिनांक १७/०७/२०२४ या दिवशी लोकशिक्षण विद्यालयात पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. सुरुवातीला शिक्षिका कु. शुभांगी आरोस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जस्मिनी मांद्रेकर यांनी विठ्ठलाच्या पालखीचे पूजन केले व विठ्ठलाच्या प्रतिमेला तुलसीहार अर्पण केला. यावेळी सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. 

पूर्व प्राथमिक विभागासाठी वेशभूषा स्पर्धा (संत) घेण्यात आली यामध्ये प्रथम – कार्तिक नाईक, द्वितीय – निवांश मांद्रेकर, तृतीय – निर्भय सावंत.

१ ली व २ री साठी श्लोक पठण स्पर्धा

प्रथम – रिहान शिरोडकर, द्वितीय – मायरा कुंब्रलकर, तृतीय – स्वरा मोरजकर

३री व ४थी साठी वेशभूषा स्पर्धा ( संत)

प्रथम – प्रतीक कासकर, द्वितीय – जिविका साठे, तृतीय – दुर्वी नाईक व सान्वी नाईक आरोंदेकर ( विभागून )

या कार्यक्रमात सर्व मुले विठ्ठल, रखुमाई, वारकरी तसेच विविध संतांच्या वेशभूषेत सहभागी झाली होती. त्यानंतर आषाढी कार्यक्रमाप्रित्यर्थ शाळेत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. “जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल” च्या जयघोषात पेटी, टाळ, मृदुंगाच्या तालात मुलांनी सुंदर अशी दिंडी सादर केली. 

या दिंडीसाठी मुलांना पखवाज वादक श्री. गोविंद नाईक सर, हार्मोनियम वादक श्री. सत्यवान परब सर यांची साथ लाभली तर शिक्षिका सौ. कोमल देसाई व शिक्षिका शुभांगी आरोसकर यांची भजन व गजर गायनाची साथ लाभली. या दिंडीमध्ये सर्वजण उत्साहाने सहभागी झाले होते. पालकांचा भरपूर प्रतिसाद लाभला. शिक्षिका सौ. तेजश्री नाईक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. 

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment