विद्याप्रसारक विद्यालयाची पालक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी सौ. प्रीती शेटगावकर विद्यालयाची सर्वसाधारण बैठक संपन्न.
विद्याप्रसारक माध्यमिक विद्यालय मोरजी या शाळेची पालक शिक्षक संघटनेची शालेय वर्ष २०२४-२५ ची पहिली बैठक उत्साहात संपन्न झाली.याप्रसंगी नवीन कार्यकारणी समितीची निवड करण्यात आली ज्यात सौ. प्रीती शेटगावकर यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले तर उपाध्यक्ष म्हणून भास्कर शेटगावकर व खजिनदार सौ.प्रतिक्षा शेटगावकर सदस्य शिवानंद दाभोलकर , विष्णू शेटगावकर , सौ निशा शेटगावकर,यांची निवड करण्यात आली.यादिवशी व्यासपीठावर खास वक्ते म्हणून वाहतूक मंडळ पेडणेचे अधिकारी श्री ज्ञानेश्वर गावस उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश बुधू शेटगावकर, उपाध्यक्ष अनंत शेटगावकर, खजिनदार संजय दाभोलकर , सल्लागार प्रसन्नकुमार शेटगावकर ,सदस्य गणेश शेटगावकर ,प्रकाश शेटगावकर , माध्यमिक विभागाच्या पालक -शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष संजय सावंत, उपाध्यक्ष सौ मंजिता तिळोजी, खजिनदार श्री.गोपाळ शेटगावकर, सदस्य शेखर म्हापसेकर, सौ प्रतीक्षा शेटगावकर,अनिल दाभोलकर, सौ रंजिता शिरोडकर,राजेंद्र शेटगावकर ,दत्ताराम नाईक, सदानंद मोरजकर, महेश शेटये तसेच शाळेचे मुख्याध्यापक दिलीप मेथर, उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली . शिक्षक दयानंद राणे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला.पालक शिक्षक संघाच्या सचिव शिक्षिका मंजिरी शेटगावकर यांनी माध्यमिक विभागाच्या पालक शिक्षक संघटनेच्या मागील वर्षाच्या बैठकीचा अहवाल व जमा खर्च सादर केला. त्याचबरोबर शिक्षक दिप्तेश हळर्णकर यांनी माध्यमिक विभागाच्या परीक्षा पद्धती संबंधी पालकांना माहिती दिली. शाळेत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची व वेगवेगळ्या स्पर्धेची माहिती शिक्षिका सौ रीमा हरमलकर नाईक यांनी दिली. शिक्षिका सौ गीतिका अगरवाडेकर यांनी ‘परख’ या नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.तर पद्माकर नाईक यांनी पालक शिक्षक संघटनेची नवीन कार्यकारणी समितीची निवड केली.
याप्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते ज्ञानेश्वर गावस यांनी पालकांना वाहतूक नियमांबद्दल माहिती देत अठरा वर्ष पूर्ण न झालेल्या मुलांना वाहनांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला.मुख्याध्यापक दिलीप मेथर यांनी उपस्थित सर्व पालकांचे मार्गदर्शन केले . व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश बुधु शेटगावकर यांनी आपल्या भाषणात सर्व पालकांना नवीन शैक्षणिक घोरणाला सकारात्मक प्रतिसाद द्या असे आवाहन केले .शिक्षिका सौ पल्लवी लाड यांनी सभेचे सूत्रसंचालन केले तर शिक्षिका सौ प्रणिता नाईक यांनी आभार प्रदर्शन करून सभेची सांगता केली.










