लोकशिक्षण विद्यालयात शिक्षा सप्ताह उत्साहात साजरा.

👇Click and Listen

लोकशिक्षण विद्यालयात शिक्षा सप्ताह उत्साहात साजरा.
पेडणे (प्रतिनिधि)
धारगळ, सोमवार दिनांक २२/०७/२०२४ ते रविवार दिनांक २८/०७/२०२४ या सप्ताहात लोकशिक्षण विद्यालय धारगळ येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020  च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने “शिक्षा सप्ताह” साजरा करण्यात आला. सोमवार दिनांक २२/०७/२०२४ रोजी शिक्षिका सौ. स्नेहा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत शिकविताना वापरले जाणारे TLM (teaching learning material) तयार करण्यात आले. मंगळवार दिनांक २३/०७/२०२४ रोजी शिक्षक श्री. सतीश चिकनाळ यांनी “एक पेड मां के नाम” ही मोहीम यशस्वीरित्या राबविली. बुधवार  दिनांक २४/०७/२०२४ रोजी शाळेत “स्पोर्ट्स डे” साजरा करण्यात आला यावेळी क्रीडा शिक्षक श्री. किशोर किनळेकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. गुरुवार दिनांक २५/०७/२०२४ रोजी शिक्षक श्री. सिद्धेश खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये एकतेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक २६/०७/२०२४ शिक्षिका सौ. उत्कर्षा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य आणि डिजिटल उपक्रम दिवस राबविण्यात आला. यावेळी विविध कौशल्य विकसित करणारे उपक्रम घेण्यात आले. तसेच मुलांना शिक्षणातील तंत्रज्ञानाविषयी अनेक उपक्रम घेण्यात आले. शनिवार दिनांक २७/०७/२०२४ या दिवशी शिक्षिका सौ. श्रुती पोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये इको क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांकडून शाळेत व परिसरामध्ये झाडे लावण्यात आली  व शिक्षिका सौ. गीता परब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सामाजिक व भावनिक विकासासाठी तिथीभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा “शिक्षा सप्ताह” यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जस्मिनी मांद्रेकर, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच पालकांनी सुद्धा हा शिक्षा सप्ताह यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण सहभाग दर्शवला

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment