जायंट्स ग्रुप ऑफ पर्वरीतर्फे मान्यवरांचा सत्कार.

👇Click and Listen

जायंट्स ग्रुप ऑफ पर्वरीतर्फे मान्यवरांचा सत्कार.

थिवि, वार्ताहर: जायंट्स ग्रुप ऑफ पर्वरी तर्फे उत्तर गोवा जिल्हा पंचायत नवनिर्वाचित अध्यक्ष  शंकर चोडणकर व यंदाच्या वर्षी गुरु वशिष्ठ पुरस्कार प्राप्त झालेले प्राचार्य विठ्ठल पार्सेकर यांचा प्रमुख पाहुणे प्राचार्य उमेश नाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

बिठ्ठोण येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्स फेडरेशन 10 चे माजी अध्यक्ष उमेश नाईक, जायंट्स ग्रुप ऑफ पर्वरी अध्यक्ष गजानन तळवणेकर, फेडरेशन दहाचे अध्यक्ष सुदन नाईक गावकर, सत्कारमूर्ती शंकर चोडणकर, प्राचार्य विठ्ठल पार्सेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे उमेश नाईक यांनी दोन्ही सत्कार मूर्तीच्या कार्याचा आढावा घेताना त्यांना शुभेच्छा दिल्या. सुदन नाईक गावकर यांनी दोन्ही सत्कारमूर्ती म्हणजे जायंट्स पर्वरीचे रत्न असल्याचे सांगून त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. याप्रसंगी सत्कार मूर्ती शंकर चोडणकर, विठ्ठल पार्सेकर यांनी सत्काराला उत्तर देताना हा सत्कार आपला नसून आपल्या कुटुंबाचा व जायंट्स ग्रुप पर्वरी यांचा असल्याचे सांगून त्यांनी जायंट्स ग्रुप प्रवरीचे आभार मानले. सुरुवातीला अध्यक्ष गजानन तळवणेकर यांनी स्वागत केले. अड. विनय धुरी व नकुल म्हामल यांनी सत्कार मूर्तीचा परिचय केला. सूत्रसंचालन प्रदीप पेडणेकर तर राजन तानकर चोडणकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला जायंट्स पर्वरी सहेली अध्यक्ष विधीती धुरी, एमडी देसाई तसेच जायंट्स सदस्य उपस्थित होते.

फोटो : सत्कार मूर्ती शंकर चोडणकर व विठ्ठल पार्सेकर यांचा सत्कार करताना उमेश नाईक, गजानन तळवणेकर, सुदन नाईक.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment