मांद्रे पंचायत च्या वतीने कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश व रेनकोट देण्यात आले.

👇Click and Listen

मांद्रे पंचायत च्या वतीने कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश व रेनकोट देण्यात आले. मांद्रे परिसरात कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर होती, ती समस्या दूर करण्याकरिता मांद्रे पंचायतने कचरा उचलण्याचे काम हाती घेतलेले आहे. परिसरातील कचरा वेळोवेळी उचलला जात आहे या कामाला प्रोत्साहन मिळण्याकरता व पावसाळ्यामध्ये काम विनाअडचणीचे दूर व्हावे याकरिता कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश व रेनकोट देण्याचे काम मांद्रे पंचायतीने आज पार पाडले. त्याचबरोबर त्यांनी दीनदयाल हॉलला जनरेटरने जोडले जेणेकरून लग्नसमारंभ वाढदिवसाचे कार्यक्रम व इतर कार्यक्रम कार्यक्रमांमध्ये वीज खंडित झाल्यास कोणत्याही प्रकारच्या अडथळे येऊ नये याकरिता मांद्रे पंचायतीने दिन दयाल हॉलला जनरेटरने जोडले. हे मांद्रे पंचायतीकडून उत्कृष्ट काम लोकांकरिता करण्यात आलेले आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment