म्हापसा येथे वॉर्ड क्रमांक 19 तळीवाडा, येथे एका जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला. नगरपालिकेचे अशा इमारतींकडे दुर्लक्ष.

👇Click and Listen

म्हापसा येथे वॉर्ड क्रमांक 19 तळीवाडा, येथे एका जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला. नगरपालिकेचे अशा इमारतींकडे दुर्लक्ष.

म्हापसा येथे वॉर्ड क्रमांक 19 तळेवाडी, येथे एका जुन्या इमारतीचा ध न वस्लॅब कोसळून दोन फोर व्हीलर गाड्यां आणि दोन दुचाकी यांचे नुकसान झालेले असून, सदर घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी किंवा इजा असा प्रकार घडलेला नाही. यासंदर्भात नगरसेवक सुधीर कांदोळकर यांना विचारले असता की मापसा नगरपालिकेने धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्याबाबत काही कार्यवाही केली आहे का? यावर त्यांनी सांगितले की  नगरपालिकेने अशा धोकादायक इमारतींची यादी तयार केलेली आहे. व सर्वांना नोटीसा देखील पाठवलेले आहेत. काही लोकांनी रिपेरिंग चे काम केलेले आहे, तर काही लोकांनी दुर्लक्ष केलेले आहे. एकंदरीत या प्रकारावर त्यांचे उत्तर असे होते. पण सदरची घटना पाहता मापसा नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचे दखल घेतलेली नाही असेच दिसत आहे. तरी नगरपालिकेने अशा इमारतींवर त्वरित कार्यावाही करावी. जेणेकरून जीवित हानी होणार नाही, याची दखल घ्यावी.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment