कोलवाळ येथील श्रीराम देवस्थानच्या सभागृहात दी.१ ते ८ मे पर्यंत पतंजली योग समिती गोवा, महिला पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट व श्रीराम देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
योग प्राणायाम शिबिरात महिलांनी मोठा उत्साह दाखवून८ दिवस योग शिबिरात हजेरी लावून विविध योग प्रकारच्या आसनांची माहिती घेतली व प्रात्यक्षिके केली.
किसान समितीसहराज्य प्रभारी तुळशीदास मंगेशकर यांनी८ दिवस प्राणायाम योग शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना अनेक योगासनांची माहिती दिली व प्रात्यक्षिके करून दाखवली.
स्थानिक योगशिक्षिका भावना चोडणकर यांनी योगसाधनापासून आपल्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या अनेक आजारापासून औषध उपचार न करता कसे बरे होतात याची माहिती दिली. महिलांनी आपल्या आरोग्य निरोगी राखण्यासाठी कोणती योगासने करावी त्याची सखोल माहिती दिली.
योग समितीचे बार्देश तालुका अध्यक्षअशोक साळगावकर,किसान सेवा समिती प्रभारी तुळशीदास मंगेशकर, युवा भारत गोवा राज्य प्रभारीसानिसिंग महेंद्रूजी, राजकुमार आडीवरेकर,व अंजली तिवारी यांनी योग शिबिरात मार्गदर्शन केले.
योग प्राणायाम शिबिरात साधकांनी भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे योग प्राणायाम शिबिर चालूच राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. जास्तीत जास्त साधकांनी योग प्राणायाम शिबिरात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची निगा राखण्यासाठीउच्च रक्तदाब,मधुमेह,हृदयविकार,कॅन्सर यासारख्या आजारावर मात करण्यासाठी प्राणायाम योग शिबिरात सहभागी होऊन घरच्या घरी आपल्या आजारापासून मुक्ती मिळवावीव मोफत योग प्राणायाम शिबिराचा लाभ घ्यावा.
फोटो : कोलवाळ येथील श्रीराम देवस्थानच्या सभागृहात योग प्राणायाम शिबिरात सहभागी झालेले साधक व प्रशिक्षक (श्रीराम चार)











