स्वखर्चाने पूर्ण केली थापनवाडा व रामभुवन वाड्यातील रस्त्यांची कामे : आ. फळदेसाई

👇Click and Listen

स्वखर्चाने पूर्ण केली थापनवाडा व रामभुवन वाड्यातील रस्त्यांची कामे : आ. फळदेसाई

आपल्या मतदारसंघातील कुंभारजुवा बेटावरील गावातील थापन वाड्याकडे जाणारा तसेच थापनवाडा व रामभुवन वाड्यातील असे एकूण तीन रस्ते हॉटमिक्सिंद्वारे चांगले केले.

करून काम पूर्ण झाल्याची घोषणा कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी गुरुवारी केली. लोकांसाठी असलेल्या बांधिलकीमुळे प्रतिकुल स्थितीवर मात करत हे, काम स्वखर्चाने पूर्ण केल्याचे आमदारांनी अभिमानाने सांगितले.

पावसाळा सुरू होण्यास अजून अवधी असला तरी पुढील आठवड्यात बिगरमोसमी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या कामात कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री करत ही कामे पूर्ण केली, असे फळदेसाई म्हणाले.

आचारसंहिता संपण्याची आणि सरकारने कामाला मंजुरी देण्याची वाट पाहिली तर कामे पूर्ण होण्यास आणखी एक वर्ष लागेल, हे माझ्या लक्षात आले. लालफितीत अडकून पडण्यापेत्रा जनतेची वेळेवर सेवा करण्यावर माझा विश्वास आहे, असे फळदेसाई म्हणाले.

अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असलेले रस्ते पूर्ण होण्याची प्रतीक्षा कुंभारजुवाची जनता करत होती. माझ्या मतदारांनी आतापर्यंत राखलेल्या संयमाबद्दल त्यांचे आभार मानतो आणि संधी दिल्यास पुढील अनेक वर्षे संधी मिळाल्यास मी त्यांची सेवा करण्याचे वचन देतो, असे फळदेसाई म्हणाले.

इतरही अनेक विकासाभिमुख उपक्रम नियोजित असून ते लवकरच जाहीर करेन, असे ते म्हणाले. तत्पूर्वी फळदेसाई यांच्या हस्ते मंगलम कासा आमोरा फेज ३ मधील रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment