स्वयंप्रेरित चित्रकार मनीष गवंडी याला श्री संजय हरमलकर यांच्याकडून मार्गदर्शन व कौतुकाची थाप.

👇Click and Listen

स्वयंप्रेरित चित्रकार मनीष गवंडी याला श्री संजय हरमलकर यांच्याकडून मार्गदर्शन व कौतुकाची थाप.

गोव्यातील प्रसिद्ध चित्रकार तथा पोट्रेटचे बादशहा समजले जाणारे ज्येष्ठ चिञकार श्री. संजय हरमलकर (भाई) यांच्या निवासस्थानी कोर गावचे मनीष महादेव गवंडी यांनी काढलेली चित्रे त्यांना दाखवली . यावेळी चित्रकार संजय भाईने मनीषचे तोंडभरुन कौतुक केले . कुठलेही मार्गदर्शन नसाताना लहान वयात खूप चांगली चिञे काढल्याचे ते म्हणाले. मनीषला मुळात चित्रकलेची आवड असल्याने अंगात त्याच्या कला आहे . यासाठी भविष्यात मनीषला चांगले मार्गदर्शन मिळाल्यास तो चांगला चिञकार होऊ शकतो असे आशीर्वाद दिले. यावेळी आपण त्याला मार्गदर्शन देण्याचे आश्वासन हरमलकर भाईने दिले. यावेळी मनीषने काढलेली सर्व चित्रांची त्यांनी आत्मियतेने पाहणी करून त्याच्यात काय त्रुटी राहिल्या याबद्दलही भाष्य करुन त्या सुधारण्यासाठी कोणती काळजी घ्यायाला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment