तूये  येथील CHC हॉस्पिटल हे गेले, सात वर्ष बांधून तयार आहे. मग चालू करायला अडचण काय? 

👇Click and Listen

तूये येथील CHC हॉस्पिटल हे गेले, सात वर्ष बांधून तयार आहे. मग चालू करायला अडचण काय?

मांद्रेचे आमदार जीत आरोळकर यांनी CHC हॉस्पिटल ला भेट दिली. भेटीदरम्यान CHC हॉस्पिटल गेले सात वर्षे बांधून तयार असून त्याचा उपयोग जनकल्याणासाठी होत नाही, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर दिले की, गेले सात वर्षे काय झाले हे मला माहिती नाही. पण येत्या चार महिन्यांमध्ये हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालू होईल याची मी आपल्याला खात्री देतो. या संदर्भात माझं बोलणं माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्याशी झालेले असून, त्यांनी सांगितले की हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू होईल, अशी त्यांनी यावेळी मला खात्री दिली. उत्तर गोव्याच्या जनतेने निश्चित रहावे हे हॉस्पिटल येत्या चार महिन्यांमध्ये पूर्ण होऊन लोककल्याणा करिता लवकरच सुरू होईल. असे यावेळी आमदार जीत आरोळकर यांनी सांगितले.

 

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment