इस्रायलने मध्य गाझामधील बुरीज कॅम्पवर केला, जोरदार बॉम्ब हल्ला.

👇Click and Listen

इस्रायलने मध्य गाझामधील बुरीज कॅम्पवर केला, जोरदार बॉम्ब हल्ला.

इस्रायलने मध्य गाझामधील बुरीज कॅम्पवर जोरदार बॉम्बफेक केली आहे. इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात पाच मुले आणि एका महिलेसह किमान 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपले युद्ध मंत्रिमंडळ बरखास्त केले आहे.

वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे की, नऊ पॅलेस्टिनी ठार झाले असून डझनभर जखमी झाले आहेत. शरणार्थी शिबिरातील लोक ईद-उल-अधा सण साजरा करण्याच्या तयारीत असताना हा हल्ला झाला, असे प्रेसचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गाझावर राज्य करणाऱ्या हमासने इस्रायलवर हल्ला करून 1200 लोक मारले होते, तर प्रत्युत्तरादाखल सुमारे 38 हजार पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment