मुंबईत दहशतीचे वातावरण, 50 हून अधिक रुग्णालयांना उडवण्याची धमकी.

👇Click and Listen

मुंबईत दहशतीचे वातावरण, 50 हून अधिक रुग्णालयांना उडवण्याची धमकी.

मुंबईत जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटलसह 50 हून अधिक हॉस्पिटल्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. याशिवाय मुंबईतील हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सलाही बॉम्बची धमकी मिळाली होती.

मुंबईतील रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. माहिती देताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटलसह मुंबईतील 50 हून अधिक हॉस्पिटल्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. 17 जून रोजी व्हीपीएन नेटवर्कचा वापरून धमकीचे ईमेल पाठवण्यात आले होते. मेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि धमकीचा उद्देश अद्याप कळू शकलेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचे सर्व ईमेल एकाच आयडीवरून आले होते – Beeble.com. या वेबसाइटचा सर्व्हर सायप्रसमध्ये होता. मेलमध्ये हॉस्पिटलच्या बेडखाली आणि बाथरूममध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment