गोमंत रंगभूमी दिनानिमित्त संस्कृती भवनात खास कार्यक्रम

👇Click and Listen

गोमंत रंगभूमी दिनानिमित्त संस्कृती भवनात खास कार्यक्रम
गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाने यंदा गोमंत रंगभूमी दिनानिमित्त म्हणजेच ११ जुलै २०२४ रोजी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ११ जुलै हा दिवस आद्य गोमंतकीय नाटककार कृष्णंभट्ट बांदकर यांची जयंती बांदकरांपासूनच अण्णासाहेब किर्लोसकरांनी प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात संगीत नाटकांची मुहूर्तमेढ रोवली.
या दिवसाचे औचित्य साधून कला आणि संस्कृती संचालनालयाने गुरूवार दि. ११ जुलै २०२४ रोजी एक खास कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.०० वाजता ज्येष्ठ गोमंतकीय रंगकर्मी आणि अभ्यासक डॉ. अजय वैद्य यांचे ‘गोमंतकीय रंगभूमी आणि कृष्णंभट्ट बांदकर यांचे योगदान’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर “फाशी” या मराठी एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे. विकासीनी मंडळ तिवरे गोवा या संस्थेवतीने या एकांकिकेचे सादरीकरण होईल. या एकांकिकेचे लेखन साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रसिध्द लेखिका व सिनेनिर्मात्या ज्योती कुंकळकर यांनी केले असून प्रा. दीपक आमोणकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. प्रसिध्द गोमंतकीय कलाकार रघुनाथ साकोर्डेकर, अजित कामत, कलानंद बांबोळकर व देवानंद नाईक यंच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘फाशी’ या एकांकिकेवर आधारीत ‘मरेपर्यंत फाशी’ हा सिनेमा काही वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याला गोवा आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून सिनेमाची निवड इफ्फी मध्ये देखील झाली होती. त्याचप्रमाणे याच संहितेवर आधारीत नभोनाट्याने राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली होती. या कार्यकमाला प्रमुख पाहुणे म्हणून कला आणि संस्कृती मंत्री श्री गोविंद गावडे उपस्थित राहणार आहेत. या बहुचर्चित एकांकिकेचा हा पहिलाच प्रयोग व व्याख्यानाचे गोमंत रंगभूमी दिनानिमित्त रसिकांसाठी मोफत आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन कला आणि संस्कृती संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
आपला विश्वासु,
اب
सगुण रा. वेळीप (संचालक कला व संस्कृती)

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment