आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विधानसभेत, पेडण्याच्या समस्यांबाबत सरकारला जागे केले.
पेडणे (प्रतिनीधी )
गोवा विधानसभेच्या अधिवेशनात पेडणे आमदारांचा आवाज ऐकू येऊ लागला. मांद्रे मतदार संघाचे आमदार विधानसभेत बोलू लागले. त्याच पद्धतीने आता पेडणे मतदार संघाचे आमदार प्रवीण आर्लेकर बोलू लागले.
त्याबद्दल पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तथा चांदेल हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस यांनी स्वागत करत असताना पेडणे मतदारसंघाचे प्रश्न त्यांनी काढलेला आवाज विधानसभेत पोहोचला. त्याबद्दल भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी त्यांचे अभिनंदन आणि स्वागत केले. मतदारसंघात अनेक प्रश्न अनेक समस्या आहेत. ते प्रश्न आणि समस्या राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे नक्कीच सोडवतील. असा विश्वास तुळशीदास गावस यांनी व्यक्त करून डॉक्टर प्रमोद सावंत हे दूरदृष्टीचे नेते असल्यामुळे पेडणे मतदार संघावर त्यांचे पूर्णपणे लक्ष आहे. आणि त्याला साथ मिळाली ती पेडणे मतदार संघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांची असे तुळशीदास गावच म्हणाले.
मोपा विमानतळावरील पिढीत शेतकरी
मोपा विमानतळासाठी एक कोटी पेक्षा जास्त जमीन 5 ग्रामपंचायतीने राष्ट्रीय प्रकल्पासाठी त्याग करून मोठ योगदान दिलेला आहे. ज्या पाच पंचायत क्षेत्रातील जमिनी या प्रकल्पासाठी गेल्या त्यातील काही शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही. सरकारने नुकसान भरपाई देण्यासाठी पावले उचललेली आहेत. पैसे सर्व शेतकऱ्यांचे मंजूर झालेले आहेत. काही शेतकऱ्यांनी अजून कागदपत्रे वारसदार हक्क जी आवश्यक असलेली कागदपत्रे सरकारकडे पोहोचवली नसल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येतात. त्याच अनुषंगाने पेडणे मतदार संघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी चालू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मोपा विमानतळा साठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना किती नुकसानी मिळाली असा प्रश्न करून ज्यांना मिळाली नाही .त्यांना मिळायला हवी, शिवाय ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना लँड लूजर प्रमाणपत्र ही सरकारने लवकर वितरित करावी. अशी जोरदार मागणी प्रवीण आर्लेकर यांनी केली.
सावळ वाडा पेडणे येथील इंदूर स्टेडियम
पेडणे सावळवाडा इंडोर स्टेडियम सरकारने 32 कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार केला होता. परंतु हा स्टेडियम क्रीडा प्रेमी साठी अजून पर्यंत खुला झाला नाही. तो स्टेडियम जीएमआर कंपनीला विमानतळासाठी भाडेपट्टीवर देऊन सरकारने एक प्रकारे क्रीडाप्रेमीवर अन्याय केलेला आहे. तो अन्याय दूर करण्यासाठी आता सरकारने जीएमआर कंपनीकडून हा इंडोर स्टेडियम ताब्यात घेऊन लोकार्पण करावा. अशी जोरदार मागणी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विधानसभेत करत असतानाच गावागावात पंचायत क्षेत्रात क्रीडांगण उभारत अशी त्याने मागणी केली.










