तांबोसे राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रस्ता आठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश: मुख्यमंत्री
तांबोसे राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रस्ता आठ दिवसाच्या करावा. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे कंत्राटदाराला निर्देश आमदार प्रवीण आर्लेकर यांचे प्रयत्न
पेडणे (प्रतिनीधी )
पेडणे तालुक्यातील तांबोसे राष्ट्रीय महामार्ग 66 वरील बाजूला असलेला सर्विस रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत बनला आहे. या रस्त्याची डागडूची जर चतुर्थी पूर्वी केली नाही .तर या रस्त्यावरून गणेश मुर्त्या नेताना आणताना बराच लोकांना त्रास होणार आहे. त्या संदर्भात नागरिकांनी या रस्त्याविषयी आपल्या कैफयेती आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे मांडल्या होत्या. आमदार प्रवीण आर्लेकर आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेऊन तांबोशी रस्त्याविषयी कैफियत मांडल्या. त्यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी तातडीने एम वी आर कंपनीच्या कंत्राट दाराला आदेश देताना हा रस्ता आठ दिवसाच्या आत व्यवस्थित करून नागरिकांना हवा तसा द्यावा. असे म्हटले आहे. याविषयी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सरकार दरबारी या रस्त्याविषयी वारंवार मुख्यमंत्र्याला सूचनाही केल्या. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन एकूण 29 रोजी मुख्यमंत्र्याची शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी आमदार प्रवीण आर्लेकरही उपस्थित होते.
यावेळी मोपा सरपंच सुबोध महाले,ओमकार कानोळकर,केतन सामंत,शैलेश सामंत, प्रकाश सामंत,संतोष शिरोडकर,श्रीकांत पाटील,पंच दयानंद गवंडी आदी शिष्टमंडळ मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना भेटले.
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना तांबोसे येथील रस्त्या संदर्भात माहिती देत असताना काम करत असून तांबोसे येथील जी ख्रिस्ती बांधवांची चर्च आहे. त्या ठिकाणी संरक्षण भिंत सर्विस रस्ता शिवाय ज्या ठिकाणी तांबोशे इथे सर्विस रस्त्याचे तीन तेरा वाजलेले आहे. तो रस्ता चतुर्थी पूर्वी करून स्थानिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी लगेच एम व्ही आर कंपनीच्या कंत्राटदाराला आदेश देताना सर्विस रस्ता आठ दिवसाच्या आत व्यवस्थित करून द्यावा अशी सूचना केली.










