बया वरक यांचे आमदार प्रवीण आर्लेकरांकडून अभिनंदन.
पेडणे:- (प्रतिनिधी )
अखिल गोवा गोमंतक धनगर समाज मंडळाच्या उपाध्यक्षपदी बया वरक यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे पेडणे मतदार संघाचे आमदार तथा हस्तकला आणि लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांनी बया वरक यांचे अभिनंदन केले आहे. संपूर्ण गोव्याच्या समितीवर पेडणे तालुक्यातून पहिल्यांदाच वरक यांची बिनविरोध निवड झाली आहे.
धनगर समाजाचे विविध विषयावर सरकार दरबारी मांडण्यासाठी समितीला वरक यांच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिले आहे. धनगर समाजातील तरुणाई सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कामगिरीने समाजाचा ठसा उमटवत आहे. पेडणे तालुक्यातील एक युवक अखिल गोमंतक समितीवर बिनविरोध निवडून येतो हि पेडणे तालुक्यासाठी आणि तालुक्यातील समाजाच्या लोकांसाठी अभिमानाची बाब असल्याचे आर्लेेकर यांनी म्हटले आहे. वरक यांच्या समाजकार्याचे कौतुक करताना यापुढेही समाजकार्य करत राहण्याचा सल्ला आर्लेेकर यांनी दिला आहे.
संपूर्ण गोव्याच्या समितीवर पेडणे तालुक्यातून इतिहासात पहिल्यांदाच बया वरक हे उपाध्यक्ष बनले आहे. त्यांना हे पद मिळाल्यानंतर पेडणे तालुक्यातील धनगर समाजाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पेडणे तालुका समिती सदैव वरक यांच्या पाठीशी असणार आहे. संपूर्ण पेडणे तालुक्यातील समाज बांधव एकत्र येऊन समाजाच्या भल्यासाठी काम करणार असल्याचे तोरसे पंचायतीचे उपसरपंच तसेच धनगर समाज पेडणे तालुका समितीचे उपाध्यक्ष रमेश बुटे यांनी सांगितले आहे.
फोटो बया वरक यांचे अभिनंदन करताना आमदार प्रवीण आर्लेकर.










