लायन्स क्लब ऑफ थिवि तफै शिक्षिकांचा सत्कार.

👇Click and Listen

लायन्स क्लब ऑफ थिवि तफै शिक्षिकांचा सत्कार

लायन्स क्लब ऑफ थिवि तफै दहा शिक्षिकाचा सत्कार प्रमुख पाहुणे रोहन सावईकर यांच्या हस्ते थिवि लायन्स हाऊस येथे करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  तथा शपथ ग्रहण अधिकारी

रोहन सावईकर, तर  विशेष अतिथी दत्ताराम बिचोलकर

लायन्स क्लब थिवि चे अध्यक्ष प्रशांत चणेकर, सचिव दीपक कडकडे, श्रवण वेरेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी रोझा परेरा, सोनाली हळदणकर, दिपाली खोरजूवेकर, हर्षा तोरसकर, स्नेहल कोरगांवकर सुप्रिया शिरसाठ, प्रार्थना नासनोडकर, निलम पाटील, या शिक्षिकांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

अध्यक्षतेखाली असलेले दत्ताराम बिचोलकर यांनी यावेळी सांगितले की राष्ट उभारणीसाठी शिक्षकांची भूमिका महत्व पूर्ण आहे. मुलावर चांगले संस्कार करण्याचे कार्य शिक्षिका उत्तम प्रकारे करू शकतात. यावेळी प्राप्ती चणेकर व भारत बेतकेकर या नवीन सदस्यांना शपथ ग्रहण अधिकारी यांनी शपथ दिली. सुरुवातीला लायन्स क्लब थिवि चे अध्यक्ष प्रशांत चणेकर यांनी स्वागत केले. शिरीष दिवकर यांनी परीचय करून दिला सुत्रसंचालन दिपक तिळवे तर दीपक कडकडे यांनी आभार मानले

फोटो भारत बेतकेकर

लायन्स क्लब थिवि चे अध्यक्ष प्रशांत चणेकर, दत्ताराम बिचोलकर, रोहन सावईकर व सत्कार मूर्ती शिक्षिका

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment