सरकारी प्राथमिक विद्यालय तोरसे ने साजरी केली आषाढी एकादशी.

👇Click and Listen

सरकारी प्राथमिक विद्यालय तोरसे ने साजरी केली आषाढी एकादशी.

सांस्कृतिक सणामधुन मुलांच्या मनात,आचार -विचारात सनातन संस्कृतीची मुल्ये जोपासताना सणाव्दारे संस्कृतीची माहीती बालकाना बालपणापासुन दिल्यास सणांचे महती आणि महत्व समजते.संस्कृती संवर्धन आणि रक्षण करणे हे बालपणापासुन विद्यार्थाना कृतीयुक्त अभियानातुन दाखविल्यास मुलांचे मन रमते आणि अशा कार्यक्रमातुन समाजाचा सुध्दा सहभाग लाभतो.नवीन शिक्षण पद्दतीत समाजाच्या सहभागातुन प्राथमिक कृतियुक्त शिक्षण यालाच प्राधान्य दिलेले आहे.

सरकारी प्राथमिक विद्यालय परबवाडा शाळेने देवशायनी आषाढी एकादशीचे औचित्य साधुन विविध वेशभुषा करून शालेय विद्यार्थाच्या सहभागाने आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली.

विठ्ठल-रखुमाईच्या सोबत साधु-संत पेहरावातील प्राथमिक विद्यार्थानी परबवाडा शाळेकडुन प्रभातफेरीला सुरूवात करून श्री देवी माऊली मंदीर पासुन ते नाईकवाडा येथील श्री देव दत्तगुरू देवस्थान पर्यत अशी प्रभातफेरीचा मार्ग आयोजित केला होता.

नाईकवाडा येथील श्री देव दत्तगुरू देवस्थानात वेषधारी विठ्ठल-रखुमाईची स्थानिक महीलांनी दिव्यारती ओवाळुन स्वागत केले.

या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रभात फेरीत सामिल पालक महीलांचे आणि सरकारी प्राथमिक विद्यालय, परबवाडा शाळेच्या विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि सहयोगी शिक्षकांचे कौतुक होत आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment